शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

By पंढरीनाथ कुंभार | Published: August 25, 2020 6:06 PM

१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे.

ठळक मुद्देएनआयएच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याचा भाई असल्याचे कोर्टाला सांगितलेपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे या हल्ल्याला सहकार्य होतेहल्ल्यासाठी वापरलेले तंत्र, सामुग्री आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे हे या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करत आहेत

नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने आज जम्मूमधील एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख असलेल्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रशीद अझगर आणि दहशतवादी संघटनेतील अनेक इतर कमांडरांचा समावेश आहे.पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून करण्यात आलेल्या या आत्मधातकी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुमारे सात जणांना अटक केली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर पुरे केले आहे. एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याचा भाई असल्याचे कोर्टाला सांगितले. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे या हल्ल्याला सहकार्य होते. हल्ल्यासाठी वापरलेले तंत्र, सामुग्री आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे हे या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करत आहेत, असे एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.दरम्यान, गतवर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दरम्यान, या हल्ल्यासाठी फऊचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. मात्र आता पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्याबाबतचं ५ हजार पानांचं आरोपपत्र तयार केलं आहे. हे आरोपपत्र आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. तसेच या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक दावे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रामध्ये पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यामधील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तानमधून आणण्यात आले होते, असे एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानmasood azharमसूद अजहर