शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:49 IST

लखनौ : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. ...

ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे 6 प्रकारचे भत्ते, सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हे सहा प्रकारचे भत्ते बंद केल्याने सरकारची वर्षाला जवळपास 1500 कोटी रुपयांची बचत होईल.गेल्या महिन्यातच योगी सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणारे 6 प्रकारचे भत्ते, सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंगळवारी एक आदेशही जारी करण्यात आला. 

सरकारने आदेश जारी करत, सीसीए (city compensatory allowance), सचिवालय भत्ता, पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते, उपअभियंत्यांना मिळणारे भत्ते कायमचे बंद केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे, की सरकारने कर्मचाऱ्यांना धोका दिला आहे. हे सहा प्रकारचे भत्ते बंद केल्याने सरकारची वर्षाला जवळपास 1500 कोटी रुपयांची बचत होईल.

आणखी वाचा - CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा

सीसीए (city compensatory allowance) एक लाखपर्यंत अथवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना दिला जातो. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना शहरांच्या वर्गवारीनुसार, दर महिन्याला 250 ते 900 रुपयांपर्यंत हा भत्ता दिला जातो. 

सचिवालय भत्ता. हा सचिवालयात कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते विशेष सचिव स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळत होता. याची जास्तीत जास्त मर्यादा 2500 रुपये एवढी होती. सचिवालयातील कर्मचाऱ्यांशिवाय महसूल परिषदेतील अध्यक्ष आणि सदस्यांना वगळता इतर कर्मचाऱ्यांना आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील अॅडिशनल रजिस्ट्रारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना मिळत होता.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

यापूर्वी, गेल्या महिन्यातच योगी सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डीए मळणार नाही. कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2020पासून जून 2021 पर्यंत महागाई भत्ता मिळणार नाही.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतEmployeeकर्मचारीGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार