CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:50 PM2020-05-11T22:50:26+5:302020-05-11T23:08:31+5:30

या लग्नात कुटुंबातील लोक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर आता जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी गावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.

CoronaVirus Marathi News newly married youth corona positive in alwar in rajasthan | CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

Next
ठळक मुद्देकोरोनाची लागण झालेल्या या युवकाचे लग्न 4 मेरोजी झाल्याचे समजतेगावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे लग्नात सहभागी झालेल्या नातलगांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासली जात आहे.


अलवर : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात किशनगडबास भागातील एका नवविवाहित तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर कुटुंबीय, नातलग आणि गावातील मंडळींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या या युवकाचे लग्न 4 मेरोजी झाल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे या लग्नासाठी ना  कुठल्या प्रकारची परवानगी घेण्यात आली होती. ना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले होते. 

असेही सांगण्यात येते, की या लग्नात कुटुंबातील लोक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर आता जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी गावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

परवानगी न घेताच केले लग्न -
एसडीएम छोटूलाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संबंधित युवकाचे लग्न लपूनछपून झाले. या लग्नात नातलग आणि सखे-सोयरे सहभागी झाले होते. या तरुणाचे लग्न मालाखेडातील माचडी गावात झाले. तेथे आणखी एका गावातू दुसरी वरात आली होती. यामुळे सतर्कता म्हणून प्रशासनाने संबंधित तरुणाच्या ससुरवाडीतील लोक आणि नातलगांची यादी तयार करून स्क्रिनिग सुरू केली आहे. परवानगी न घेताच लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर, आता प्रशासन यासंदर्भात गुन्हा नोंदवणार असल्याचेही समजते.

आणखी वाचा - CoronaVirus News: अमेरिकेनंतर आता रशियात कोरोना 'बेलगाम'; 'या' बाबतीत इटली अन् स्पेनलाही टाकले मागे

कुटुंबातील 18 जणांचे घेतले सॅम्पल -
संबंधित 19 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुण दिल्ली येथील आझादपूर बाजारात भाजी घेऊन जात होता. लग्नाच्या वेळी त्याच्या संपर्कात अनेक लोक आले. सध्या या तरुणाला अलवर येथील राजीव गांधी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्या पत्नीला आणि कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबातील 18 जणांचे सॅम्पलही घेण्यात आले आहे, असे छोटुलाल शर्मा यांनी सांगितले.

गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात -
आरोग्य कर्मचाऱ्यांनी 7 मेरोजी संबंधित तरुणाचे सॅम्पल घेतले होते. सोमवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या आरोग्य कर्मचारी गावात स्क्रिनिंग करत असून डोअर टू डोअर सर्व्हे केला जात आहे. तसेच गावात अतिरिक्त पोलीस फोर्सदेखील तैनात करण्यात आला आहे. याशिवाय लग्नात सहभागी झालेल्या नातलगांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासली जात आहे.

आणखी वाचा - पाकिस्तानच्या मनात भारताची धडकी, सर्जिकल अन् एअर स्ट्राईकनंतर वाटते 'या' हल्ल्याची भीती

Web Title: CoronaVirus Marathi News newly married youth corona positive in alwar in rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.