CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:48 AM2020-05-14T11:48:18+5:302020-05-14T11:56:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वकिलांनाही नवा ड्रेस कोड देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

CoronaVirus Marathi News supreme court issued circular newdress code virtual hearing SSS | CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा कहर हा जगभरात पाहायला मिळत आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78,000 वर पोहचली आहे. तर 2400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी या बदलल्या आहेत. वकिलांनाही नवा ड्रेस कोड देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वकिलांना व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान नेहमीचा काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नसल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकील हे आता पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार आहेत. युक्तीवाद करताना वकील केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरू शकणार आहेत. त्यांना त्यावर काळा कोट घालण्याची गरज नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं आहे. 'व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान वकील प्लेन पांढरा शर्ट, महिला वकील पांढऱ्या रंगाची सलवार-कमीज, साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरू शकतात. कोरोना संदर्भातील परिस्थिती कायम आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे' असं यामध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

Web Title: CoronaVirus Marathi News supreme court issued circular newdress code virtual hearing SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.