शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 21:20 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.

बरेली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 63 लाखांवर पोहोचली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 377,889 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,389,493 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.

माणसांप्रमाणेच आता प्राण्यांसाठीही लस तयार करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे भारतातील शास्त्रज्ञांनी त्या दिशेने तयारी देखील सुरू केली आहे. बरेलीतील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार आहे. आयआयटी रूकीसह ही लस विकसित केली जाणार आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्राण्याला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. मात्र न्यूयॉर्कमध्ये एक वाघ आणि हाँगकाँगमध्ये काही पाळीव प्राणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. भविष्यात प्राण्यांमध्ये कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेत लस विकसित केली जाते आहे.

IVRI चे संचालक आर. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च (ICAR) चे डायरेक्टर जनरल यांच्या निर्देशानुसार पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस विकसित करण्याचा विचार करत आहोत. तसेच लॅब आणि फिल्डवर वापरता येईल अशी डानोस्टिक टेस्ट तयार करण्याचाही विचार आहे'. भविष्यात प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरला तर व्हायरस आपल्यात जेनेटिक बदल करेल आणि तेदेखील आजारी पडू शकतात. प्राण्यांमधील कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सध्या संशोधन करण्यात येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीची आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 5 ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. मुलांवरील उपचारासाठी याची गरज पडू शकते त्यामुळे शास्त्रज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट

इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूmedicinesऔषधं