coronavirus lockdown in kerala class 9th girl commits suicide SSS | धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

मल्‍लापूरम - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक लाख 90 हजारांच्यावर गेला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. इयत्ता नवव्या शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने ही मुलगी अत्यंत निराश झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

विद्यार्थिनीचे वडील रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे सध्या अत्यंत अल्प उत्पन्नावर घर चालवावे लागत आहे. 'घरामध्ये टीव्ही आहे. पण तो बंद आहे. टीव्ही दुरुस्त करण्याची गरज आहे असे तिने मला सांगितले होते. पण मी तो दुरुस्त करू शकलो नाही. तिने टोकाचे पाऊल का उचलले ते समजत नाही. मैत्रिणीच्या घरी जाऊ शकतेस असा पर्याय मी तिला सुचवला होता' अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

English summary :
coronavirus lockdown in kerala class 9th girl commits suicide

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus lockdown in kerala class 9th girl commits suicide SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.