CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 03:49 PM2020-07-25T15:49:01+5:302020-07-25T16:27:34+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लग्न सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. 

CoronaVirus Marathi News haryana hisar marriage 80 people corona positive | CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 12 लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. काही जण मोजक्याच मंडळीच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगच पालन करत लग्न करत आहेत. तर अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. लग्न सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. 

लग्न समारंभात सहभागी झालेल्या अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. तब्बल 80 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिसारमधील लीलावती पॅलेसमध्ये एका लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

सोशल डिस्टंसिंगचं पालन न करता जवळपास 150 हून अधिक लोकांनी या लग्नाला हजेरी लावली. यामधील 80 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. लग्नात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक टीमदेखील नेमण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने यााबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे. मात्र तरी देखील अशा घटना या सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूरर्वी बिहारमध्येही अशीच एक घटना घडली होती. कोरोनामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तसेच लग्न समारंभाला हजेरी लावलेले तब्बल 95 जणांना कोरोनाची लागण झाली. पालिगंजमध्ये एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेली 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

Web Title: CoronaVirus Marathi News haryana hisar marriage 80 people corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.