बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 03:01 PM2020-07-25T15:01:25+5:302020-07-25T15:06:04+5:30

सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भरधाव ट्रेनसमोर स्टंट करणाऱ्या मुलांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

video children in bihar did dangerous stunt in front of running train | बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच अनेक घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भरधाव ट्रेनसमोर स्टंट करणाऱ्या मुलांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील बेतियामध्ये मुलांनी ट्रेनसमोर जीवघेणा खेळ केल्याची माहिती मिळत आहे. 

भरधाव ट्रेनसमोर मुलांनी केलेल्या या स्टंटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मुलांवर जोरदार टीका केली आहे. व्हिडीओमध्ये एका नदीवर रेल्वेचा पूल आहे. नदीत उडी मारण्यासाठी, पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काही मुलं या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. ट्रेनचा आवाज आला आणि ती जवळ आली की ते नदीमध्ये उडी मारतात असं पाहायला मिळत आहे. 

आपला जीव धोक्यात घालून ही मुलं फक्त मजेसाठी हा असा खेळ करत असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यावर रेल्वेने देखील याची गंभीर दखल घेतली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांचा हा खेळ नेहमीच सुरू असतो. मात्र त्याला योग्य सल्ला देण्याचं सोडून अनेक जण त्याचा हा जीवघेणा खेळ कॅमेऱ्यात कैद करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. 

भरधाव वेगात बाईक चालवायला अनेकांना आवडतं. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत जास्त वेगात बाईक चालवण्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमध्ये असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र वेगाने बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला हे चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. सुपरबाईकचं वेड असलेल्या एका व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर जवळपास 300 किलोमीटर प्रतितास वेगाने वेगाच्या मर्यादेपेक्षा अधिक वेगात बाईक चालवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी बाईक तर जप्त करून त्याला अटक केली. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

Web Title: video children in bihar did dangerous stunt in front of running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.