CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:48 AM2020-05-10T09:48:02+5:302020-05-10T09:59:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 59 हजारांवर गेला आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे.

CoronaVirus Marathi News covid 19 maharashtra increased concern of government SSS | CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

Next

मुंबई - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 40 लाखांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने 2 लाख 78 हजार 800 जणांचा बळी घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 59 हजारांवर गेला आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी 20 हजारांवर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना रुग्णांची ही संख्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 33% आहे. महाराष्ट्रात सतत वाढणाऱ्या या प्रकरणांमुळे केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

देशातील 15 जिल्ह्यांमध्ये 64% प्रकरणे आहेत. यातील दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील जिल्ह्यांमध्ये 50% कोरोना प्रकरणे आहेत. सध्या या 5 शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर महाराष्ट्रात 779 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1165 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार 228 इतका झाला आहे. दिवसभरात 330 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत तब्बल 3800 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 12,864 वर गेली असून 489 जणांचा मृत्यू झाला आहे. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 27 मुंबई शहरातील, 9 पुणे, 8 मालेगाव, तर अकोला, नांदेड आणि अमरावतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, मुंबईतील धारावी परिसरात 5 लोकांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाविरोधात देशवासीयांचा लढा सुरू असला तरी गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात 1 ते 8 मेदरम्यान 24 हजार 832 नव्या रुग्णांची भर पडली. लॉकडाउन, फिजिकल डिस्टन्सिंग, घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुण्याची सवय लोकांनी अंगीकारली असली तरी या काळात कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. तिसऱ्या लॉकडाउनचा शेवटचा आठवडा सुरू होताना देशातील रुग्णसंख्या 60 हजारांवर पोहोचली. दररोज सरासरी साडेतीन हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

coronavirus: कोरोनाचा उद्रेक! जगभरात ४०.७२ लाख; देशात ६२ हजार, तर राज्यात २० हजार रुग्ण

 

Web Title: CoronaVirus Marathi News covid 19 maharashtra increased concern of government SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.