शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 3:06 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून तब्बल अकरा लाखांचा टप्पा आता पार केला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. 

डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिल्याने डॉक्टरना आपला जीव गमवावा लागला आहे. मंजूनाथ असं डॉक्टरचं नाव असून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. मंजुनाथ हे रामनगर जिल्ह्यातील  एका प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करत होते. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप येऊ लागला. 25 जूनला ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मंजूनाथ यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यासाठी तीन खासगी रुग्णालयांनी नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मंजूनाथ यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने अखेर त्यांना बंगळुरूमधील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या कुटुंबातील आणखीन 6 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही डॉक्टर असून सुद्धा आम्हाला अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असल्याचं डॉ. मंजुनाथ यांच्या भावाने म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूKarnatakकर्नाटक