शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 3:20 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. मात्र ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. मात्र याच दरम्यान ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अखिलेश यांनी ट्विरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. रविवारी (3 मे) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक ट्वीट केलं आहे. 'रेल्वेद्वारे घरी परतणाऱ्या गरीब, असहाय्य मजुरांकडून भाजपा सरकारद्वारे पैसे घेण्याची बातमी लज्जास्पद आहे. भांडवलदारांचे कोट्यवधी रुपये माफ करणारी भाजपा श्रीमंतांच्या सोबत आणि गरीबांच्या विरुद्ध आहे, हे आज उघड झालं. संकटसमयी शोषण सावकार करतात, सरकार नाही' असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना विशेष ट्रेनमधून आपल्या गावी नेण्याआधी त्यांची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत ना, याची खातरजमा केल्यानंतरच त्यांना ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसंच, पूर्ण प्रवासात त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असेल. या मजूर-विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था राज्य सरकारने करायची आहे. 

रेल्वे आणि संबंधित राज्य सरकारांनी या ट्रेन प्रवासाच्या समन्वयासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेष ट्रेनने आपल्या राज्यात पोहोचलेल्या मजूर-विद्यार्थी-पर्यटकांना संबंधित राज्य सरकार उतरवून घेईल आणि रेल्वे स्टेशनवरच त्यांची तपासणी करेल. गरज वाटल्यास या प्रवाशांना क्वारंटाईनही केलं जाईल. त्यामुळे, मजूर-विद्यार्थ्यांची ने-आण करताना कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkhilesh Yadavअखिलेश यादवTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाrailwayरेल्वे