Join us  

माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 4:54 PM

माधुरी दीक्षितने  80 ते 90 च्या दशकात नृत्य आणि अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं.

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) फक्त सामान्य लोक चाहते नाहीत तर सेलिब्रिटीही तिचे फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमधील एक अभिनेता तर माधुरीला पाहून तिच्या सौंदर्यावर फिदाच झाला होता. तसंच नंतर त्याने असं काही केलं की सगळेच अवाक झाले होते. काय आहे तो किस्सा आणि कोण आहे तो अभिनेता वाचा.

माधुरी दीक्षितने  80 ते 90 च्या दशकात नृत्य आणि अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. या मराठमोळ्या अभिनेत्रीचं टॅलेंट पाहून लोक अक्षरश: तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे. आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. अनेक सेलिब्रिटीही तिच्यावर फिदा होते. त्यातलाच एक अभिनेता ज्याने माधुरीला पाहताच स्वत:ला भाजून घेतलं होतं. तो अभिनेता आहे अजय देवगण (Ajay Devgn). एका मुलाखतीत अजय देवगण म्हणाला होता, "आम्ही ये रास्ते है प्यार के सिनेमाचं शूट करत होतो. मी स्मोक आणि ड्रिंक करत होतो. माझ्यासोबत बाकी स्टारकास्टही बसली होती. तेवढ्यात माधुरी आली आणि बसली. ती इतकी सुंदर दिसत होती की चुकून सिगारेट माझ्या हनुवटीला लागली. आजही इथे खूण आहे. मी तिला बघण्यात इतकं गुंग झालो की सिगारेट उलटी लावली."

'टोटल धमाल' सिनेमाच्या प्रमोशनवेळी अजयने हा किस्सा सांगितला होता. हे ऐकून माधुरीही शॉक झाली होती. 'तू गंमत करत आहेस ना?' असं ती म्हणाली होती. तेव्हा नाही मी खरंच बोलतोय म्हणत अजयने ते खूणही दाखवली होती. 

अजय देवगण आणि माधुरी दीक्षित यांची जोडी काही फारशी गाजली नाही. मात्र दोघांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज दोघंही सुपरस्टार आहेत. 'टोटल धमाल', 'ये रास्ते है प्यार के', 'लज्जा' या सिनेमांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.

टॅग्स :अजय देवगणमाधुरी दिक्षितबॉलिवूड