Join us  

शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 6:52 PM

IPL सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली

अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) तब्येत बिघडली असून त्याला गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयपीएल(IPL) मॅच निमित्त शाहरुख अहमदाबादमध्ये होता. उन्हामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला तात्काळ अहमदाबाद येथील KD रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे झालेलं डिहायड्रेशन हे मूळ कारण आहे. 

आयपीएल(IPL) प्ले ऑफ सामन्यासाठी शाहरुख स्वत:ची टीम कोलकाता नाईट रायडर्स(KKR) ला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबाद येथे होता. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत आहे. त्यातच शाहरुखलाही उष्माघाताचा फटका बसला. डिहायड्रेशन झाल्या कारणाने त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला लगेच डिस्चार्जही देण्यात आला आहे.  डॉक्टरांनी काही सल्ले दिले असून त्याप्रमाणे काळजी घेण्यास सांगितलं आहे. आज शाहरुखच्या लेकीचा सुहानाचा वाढदिवसही आहे. 

शाहरुख खानची टीम कोलकता नाईट रायडर्स(KKR) फायनलला पोहोचली आहे. पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात KKR  ने हैदराबादला ८ विकेट्सने हरवले. या सीझनमध्ये आपल्या टीमचा दमदार परफॉर्मन्स बघून शाहरुखही खूप खूश आहे. स्टेडियममध्ये दर सामन्याला शाहरुख आणि त्याची मुलं हजेरी लावत होती. शाहरुखने सामना जिंकल्यानंतर चाहत्यांना त्यांची सिग्नेचर पोजही करुन दाखवली. तसंच इतर खेळाडूंसोबत संवाद साधताना शाहरुखचे फोटो व्हायरल झाले. आता सर्वांचंच फायनलकडे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :शाहरुख खानहॉस्पिटलआयपीएल २०२४गुजरातउष्माघात