शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:35 PM

१ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळवीर पोहोचल्याने तामिळनाडू सरकारने चेन्नईसह चार जिल्ह्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहेचेन्नई, कांचीपुरम, चेंगलटपट्टू आणि तिरवल्लूर या मेट्रोपोलिटीन चेन्नई पोलीसांच्या हद्दील येणाऱ्या भागांमध्ये हे लॉकडाऊन लागू राहणार आहेलॉकडाऊनमधील सक्तीही वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत

चैन्नई - देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात सु्मारे सव्वा दोन महिने लॉकडाऊन सुरू होते. दरम्यान, १ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील एका महानगरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळवीर पोहोचल्याने तामिळनाडू सरकारने चेन्नईसह चार जिल्ह्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहे. या जिल्ह्यांमध्ये १९ ते ३० जूनदरमम्यान लॉकडाऊन लागू राहणार आहे. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलटपट्टू आणि तिरवल्लूर या मेट्रोपोलिटीन चेन्नई पोलीसांच्या हद्दील येणाऱ्या भागांमध्ये हे लॉकडाऊन लागू राहणार आहे. लॉकडाऊनमधील सक्तीही वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांनी १९ ते ३० जूनदरम्यान लागू होणाऱ्या या लॉकडाऊनला मॅक्सिमाईझ रेस्ट्रिक्टेड लॉकडाऊन असे नाव दिले आहे. त्यातून या जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे तसेच निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  तामिळनाडू हे सध्या देशातील कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.  

तामिळनाडूमधील केवळ चेन्नई या शहरात कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या वर पोहोचला आहे.  तामिळनाडूमध्ये सद्यस्थितीत दरदिवशी कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण सापडत आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ६६१ रुग्ण सापडले असून, ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २४ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तामिळनाडूमधील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे चेन्नई आणि आसपासच्या भागात आहेत. ही बाब विचारात घेत या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नई