शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:51 AM

1 / 7
सरकार दर महिन्याच्या एक तारखेला नियम बदलत असतं. यामुळे आपल्या खिशावर परिणाम होतो. आता मे महिना संपत आला आहे. काही दिवसांतच जून महिना सुरू होणार आहे.
2 / 7
१ जूनपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. बदललेल्या नियमांमुळे थेट आपल्या खिशावर परिणाम होणार असून काही वस्तु महागणार आहेत तर काही स्वस्त होणार आहेत.
3 / 7
देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदल होत असतो. एलपीजी सिलिंडरची किंमत ऑइल मार्केटिंग कंपन्या ठरवतात. कंपन्या १४ किलोच्या घरगुती आणि १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती निश्चित करतात.
4 / 7
यासोबतच सीएनजी आणि पीएनजीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.एक जून रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो. तेल कंपन्या १ जून रोजी गॅस सिलिंडरचे दर ठरवतात.
5 / 7
UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख १४ जूनपर्यंत वाढवली आहे. आधार धारक सहजपणे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतात. ऑफलाइन अपडेटसाठी म्हणजेच आधार केंद्रावर जाण्यासाठी प्रति अपडेट ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
6 / 7
देशात वाहन चालवण्याचे वय १८ वर्षे आहे. १८ वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास मोठा दंड आकारण्यात येईल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला २५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या २५ वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही.
7 / 7
१ जूनपासून देशात वाहतूक नियमांमध्येही बदल होणार आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम जूनपासून लागू होणार आहेत. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला मोठा दंड भरावा लागणार आहेत.
टॅग्स :businessव्यवसायAdhar Cardआधार कार्डbankबँकCylinderगॅस सिलेंडर