जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:26 PM2020-06-11T23:26:35+5:302020-06-11T23:26:49+5:30

नियंत्रण रेषेवर कुरापती काढणाऱ्या आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा धडा शिकवला. आज भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याचा १० चौक्या उद्ध्वस्त केल्या.

Great! Indian Army destroy Pakistan army's 10 post on LOC | जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

googlenewsNext

श्रीनगर - दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सातत्याने नियंत्रण रेषेवर कुरापती काढणाऱ्या आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा धडा शिकवला. आज भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याचा १० चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ विभागात आज गोळीबार केला होता. त्यात जवान हरचरण सिंह यांना वीरमरण आले होते, दरम्यान, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने  हरचरण सिंह यांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.  

दरम्यान, राजौरीमधील नौशेरा परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. पाकिस्तानी सैन्याने काढलेल्या कुरापतीनंतर भारती लष्कराने त्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या १० चौक्या उद्ध्वस्त झाल्या. भारतीय लष्कराने कहवलियन नाली सम्हानी सेक्टरमधील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराच्या या कारवाईत पाकिस्तानी सेन्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय लष्कारने पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या आगळीकीला चोख उत्तर दिलेले आहे.  

Web Title: Great! Indian Army destroy Pakistan army's 10 post on LOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.