Join us  

Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 9:42 AM

Hardik Pandya : हार्दिकबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशाला हार्दिकबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं.

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या हे आडनाव काढून टाकल्याने या चर्चा सुरू झाल्या. त्या दोघांनीही सोशल मीडियावरील फोटोही डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता नताशाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

हार्दिकबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशाला हार्दिकबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. याचा व्हिडिओ 'इन्स्ंटट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत नताशाबरोबर मिस्ट्री मॅनही दिसत आहे. हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारताच नताशाने फक्त दोनच शब्दांत उत्तर दिलं. "थँक्यू सो मच" असं म्हणून नताशाने याबाबत बोलणं टाळल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यात हार्दिक आणि नताशाला अगस्त्य हा मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा गेल्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये त्यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. हार्दिक-नताशाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

नताशाने इन्स्टाग्रामवरुन पांड्या हे नाव काढून टाकलं. तसंच हार्दिकने नताशाच्या वाढदिवशीही कोणतीच पोस्ट केली नाही. नताशा यावेळी आयपीएलमध्येही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यानच, घटस्फोटाच्या प्रकरणात हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागणार असल्याच्याही अफवा रंगल्या आहेत. पण, अद्याप याबाबत नताशा किंवा हार्दिकने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचघटस्फोट