CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; डेथ सर्टिफिकेटसाठी लागल्या भल्या मोठ्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:37 PM2021-04-27T18:37:55+5:302021-04-27T18:47:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates people gathered in long que for death certificate in surat gujarat coronavirus | CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; डेथ सर्टिफिकेटसाठी लागल्या भल्या मोठ्या रांगा

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; डेथ सर्टिफिकेटसाठी लागल्या भल्या मोठ्या रांगा

Next

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,23,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2771 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,76,36,307 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,97,894 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनाच्या संकटात अनेक गोष्टींसाठी लोकांनी ठिकठिकाणी रांगा लावल्याचं चित्र कित्येकदा पाहायला मिळालं आहे. यातच आता सूरतमधील लोकांना आपल्या नातेवाईकांचे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठील अडचणींच सामना करावा लागत आहे. डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. शहरातील मृतांची संख्या फार जास्त आहे. सुरतमध्ये सरकारी कार्यालयांच्या बाहेर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात सुरतमध्ये 500 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

मृतांचा हा आकडा अधिकृत आहे. मात्र स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या मृतदेहांचा विचार करता खरा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा  मृत्यू झाल्यानंतर सरकारी कामांसाठी डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचं प्रमाणत्र हे अत्यंत महत्त्वाचं काददपत्र मानलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी लोक आता सरकारी कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. कित्येक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याची माहिती अनेकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. 

भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार 

कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. आग्रा शहरातील लोकांवर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह तब्बल 90 किलोमीटर दूर अलीगडमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates people gathered in long que for death certificate in surat gujarat coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.