शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,257 नवे रुग्ण; 42 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 11:32 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 18,257 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 42 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी (10 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,25,428 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी लाखो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अनेक जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. 

कोरोना टेस्टला चकवा देऊ शकतो नवा सब व्हेरिएंट; प्रशासनाची वाढली चिंता

कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा नवीन सब व्हेरिएंट सध्याच्या तपास पद्धतींना चकवा देऊ शकतो. सध्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे चाचणी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित IGIB च्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोनाचे सर्व प्रकार समोर आल्यानंतर चाचणी पद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅबमध्ये कोरोना चाचणी किटसह फ्रिक्वेन्सी तपासल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे.

देशातील बहुतांश राज्ये सध्या रॅपिड अँटीजन किट वापरत आहेत. तर कोरोना BA.4, BA.5 आणि BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट कोरोना चाचणीच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकतात. IGIB वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद स्करिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे की सब व्हेरिएंट ba.2.75 मधील म्युटेशन कोरोना व्हायरस शोधण्याच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकते. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की रॅपिड अँटीजेनच्या वापरामुळे तेथे संक्रमणाचे स्त्रोत गायब झाले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत