Coronavirus: जगातील १२७ देशांना कोरोनाचं औषध पाठवणार ‘ही’ भारतीय कंपनी; अमेरिकन कंपनीशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:42 PM2020-05-13T13:42:53+5:302020-05-13T13:45:40+5:30

देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी जुबिलंट लाइफ सायन्स १२७ देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी असणाऱ्या रेमेडेसिवीर औषध विकणार आहे.

Coronavirus: Jubilant Life inks licensing agreement with Gilead to manufacture Remdesivir pnm | Coronavirus: जगातील १२७ देशांना कोरोनाचं औषध पाठवणार ‘ही’ भारतीय कंपनी; अमेरिकन कंपनीशी करार

Coronavirus: जगातील १२७ देशांना कोरोनाचं औषध पाठवणार ‘ही’ भारतीय कंपनी; अमेरिकन कंपनीशी करार

Next
ठळक मुद्देजुबिलंट लाईफ सायन्सने गिलियड या अमेरिकन कंपनीशी करार केला ज्युबिलंट लाइफ सायन्स रेमेडेसिवीरचे मार्केटींगही करेल.गिलियडने रेमडेसिवीर बनविण्यासाठी तीन भारतीय कंपन्यांशी करार केला

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासमोर मोठं आव्हान निर्माण केले आहे. आतापर्यंत जगात ४२ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखाच्या आसपास लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना आजारावर कोणतीही प्रभावी लस न मिळाल्याने रुग्णांवर प्रभावी उपचार करता येत नाही.

देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी जुबिलंट लाइफ सायन्स १२७ देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी असणाऱ्या रेमेडेसिवीर औषध विकणार आहे. यासाठी जुबिलंट लाईफ सायन्सने गिलियड या अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. हा करार भारत आणि इतर १२७ देशांसाठी आहे. ज्युबिलंट लाइफ सायन्स रेमेडेसिवीरचे मार्केटींगही करेल. जुबिलंट लाइफ सायन्स व्यतिरिक्त, गिलियडने हेटरो आणि सिप्लाशीही करार केला आहे.

अमेरिकन कंपनी गिलियडने रेमडेसिवीर बनविण्यासाठी तीन भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. या तीन कंपन्यांमध्ये ज्युबिलंट लाइफ सायन्स, हेटरो आणि सिप्ला ही आहेत. ज्युबिलंट लाइफ सायन्स या देशांमध्ये या औषधांची विक्री करेल. गिलियडच्या मते, रेमडेसिवीर बनविण्याच्या प्रक्रियेचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा कंपन्यांना हक्क असेल. हे उत्पादन वाढविण्यात मदत करेल. जेनेरिक औषधे तयार करण्याचा परवाना आणि कंपनीला त्याची किंमत ठरविण्याचा अधिकार असेल.

जुबिलंट लाइफ सायन्सचे अध्यक्ष श्याम भारतीया आणि व्यवस्थापकीय संचालक हरी एस भारतीया म्हणाले की, आम्ही क्लिनिकल चाचणी व औषधाची नियामक मान्यता देखरेख ठेवू आणि मंजूरीनंतर औषध उत्पादन सुरू केले जाईल. आमची योजना देशात औषधाचा एपीआय तयार करण्याची आहे. यामुळे रेमडेसिवीरची किंमत कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेला झाला आहे. तेथे कोरोनामुळे ८० हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, भारतात देखील कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण ७० हजारांच्या पुढे गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेमडेसिवीरला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन चालू आहे. भारत सरकारनेही कंपन्यांना देशात कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन करण्यास सांगितले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

२० लाख कोटींमध्ये किती शून्य येतात?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

Web Title: Coronavirus: Jubilant Life inks licensing agreement with Gilead to manufacture Remdesivir pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.