Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:41 AM2020-05-13T07:41:31+5:302020-05-13T08:04:17+5:30

Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले

How many zeros in 20 lakh crores?; Anupam Kher Answer and the Finance Minister made a mistake pnm | Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीसोशल मीडियात निर्णयाचं कौतुक करताना नेटिझन्सने घेतली फिरकीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही केली चूक पण तातडीने केली दुरुस्त

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, त्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्रेंड सुरू झाला. या निर्णयाचे कौतुक करून लोकांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली की, सांगा २० लाख कोटींमध्ये किती शून्य आहेत? या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरही पुढे आले.

अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये २० लाख कोटी शून्यामध्ये लिहून दाखवले आणि माझे गणित बरोबर आहे ना? असं लोकांना विचारलं. ट्विटरवर #20lakhcrores ने ट्रेंड करण्यास सुरवात केली. पॅकेजबद्दल आधीच चर्चा केली जात होती, मात्र लोक शून्यावरही मनोरंजक गोष्टी लिहित होते. अनुपम खेर यांनी ट्वीट केलं की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकतं आणि प्रेरणा घेते. १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. २०,००,००० कोटी असं दिसतात - २0000000000000! गणित बरोबर आहे ना? बहुधा! त्यांचे हे ट्विट काही मिनिटांत व्हायरल झाले. काही वेळात सुमारे साडेतीन हजार लोकांनी रीट्वीट केलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले. निर्मला सीतारमण यांनी लिहिलं होतं की स्वावलंबी भारत मोहिमेसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले गेले आहे. ज्यामध्ये जीडीपीच्या सुमारे १०% (सुमारे २० लाख रुपये) वचनबद्ध आहे. त्यांच्याकडून अशी चूक झाली की २० लाख कोटी ऐवजी केवळ 20 लाख लिहिले गेले. त्यानंतर त्यांनी लगेचच दुसरे ट्विट करून दुरुस्त केले.

NBT

दरम्यान, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारच्या भाषणात दिली.

 

Web Title: How many zeros in 20 lakh crores?; Anupam Kher Answer and the Finance Minister made a mistake pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.