Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:25 AM2020-05-13T11:25:59+5:302020-05-13T11:29:56+5:30

Lockdown News: कार्यकारी स्तरावरील कर्मचार्‍यांना नोकऱ्यांबद्दल माहिती देणार्‍या ग्लोबलहंटच्या अहवालानुसार यावर्षी भरती प्रक्रिया जवळपास थांबली आहे, परंतु असे काही उद्योग आहेत जिथे अजूनही मागणी आहे

Coronavirus: Employment opportunities even in the Corona crisis pnm | Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

Next
ठळक मुद्देमागणी आणि पुरवठा साखळी खंडित होणे देखील याला एक मोठे कारण'लॉकडाऊन'मुळे एअरलाईन, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल्स, वाहने, किरकोळ उत्पादन बंद लाईफ सायन्स आणि आरोग्याशी संबंधित उद्योगांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढेल

नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेल्या स्थितीत असल्याने रोजगाराचेही मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे काही कंपन्यांनी नवीन नेमणुका लांबणीवर टाकल्या आहेत. तरी उद्योगातील आकडेवारीनुसार, या वर्षी नियुक्त्या होतील मात्र त्याचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे.

कार्यकारी स्तरावरील कर्मचार्‍यांना नोकऱ्यांबद्दल माहिती देणार्‍या ग्लोबलहंटच्या अहवालानुसार यावर्षी भरती प्रक्रिया जवळपास थांबली आहे, परंतु असे काही उद्योग आहेत जिथे अजूनही मागणी आहे आणि येत्या काळात ही मागणी आणखी वाढताना दिसून येईल. कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी राबविल्या जाणार्‍या 'लॉकडाऊन'मुळे एअरलाईन, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल्स, वाहने, किरकोळ उत्पादन बंद करण्यात आले आहे. मागणी आणि पुरवठा साखळी खंडित होणे देखील याला एक मोठे कारण आहे. तथापि, कोविड -१९ ही काही क्षेत्रात संधी म्हणून पाहिले जात आहे.

कोरोना आजारामुळे लाईफ सायन्स आणि आरोग्याशी संबंधित उद्योगांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढेल. याशिवाय दूरसंचार क्षेत्रातही मागणी वाढू शकते. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लोक सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. जर कोरोना संकट लवकरच संपत नसेल तर वर्क फ्रॉम होमची संस्कृती पुढेही चालू राहील. कोरोना व्हायरसकडे संधी म्हणून पाहणारे लोक म्हणतात की, यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्तीदेखील वाढेल, कारण जे आता ऑनलाइन खरेदी करीत नव्हते ते देखील यात सामील होऊ शकतात. अहवालानुसार डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म प्रदान करणार्‍या कंपन्यांही नवीन नोकरी भरती करु शकते. लोक घराबाहेर खरेदी करण्यासाठी येऊ शकत नाही तोपर्यंत हे सुरु राहील.

हा रिपोर्ट संभाव्य कंपन्या आणि नोकरी शोधणारे इच्छुक तरुण यांच्याशी संवाद करुन तयार केला आहे. कोरोनामुळे पगार आणि पगाराच्या वाढीवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होईल असंही यात नमूद केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटाआधी नोकरी सोडून दुसर्‍या कंपनीकडे जाण्याने पगार ३० ते ५० टक्क्यांनी वाढला असता, परंतु रोजगाराच्या कमी संधींमुळे पगार केवळ १५ ते २५ टक्केच वाढू शकतो.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

२० लाख कोटींमध्ये किती शून्य येतात?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Web Title: Coronavirus: Employment opportunities even in the Corona crisis pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.