शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : भाडेकरूंना दिलासा! पुढच्या महिन्याचं भाडं घ्याल तर थेट जाल तुरुंगात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 21:47 IST

CoronaVirus : उत्तर प्रदेशात नोएडातील जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कामगारांसाठी मोठा निर्णय घेत त्यांच्यासाठी खुशखबर दिली आहे .

ठळक मुद्देदेशातील रोजंदारीवर काम करणारे कामगार, मोलमजुरी करणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या लोकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.घरमालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे स्वागत केलं आहे. भाडेकरूंनी घर सोडून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे देशातील रोजंदारीवर काम करणारे कामगार, मोलमजुरी करणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या लोकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. हे लोक रोजगारासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतरित होतात. तेथे बहुतांश कामगार भाड्याच्या घरात राहत असतात. त्यामुळे ज्यांना या परिस्थितीत  एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यातच रोजंदारीवर काम करणाऱ्या काहींना मिळणारे पैसे ह्या महिन्यात मिळणार नाही. त्यामुळे घर भाडे कसं हा देखील प्रश्न भेडसावत असेल. मात्र, उत्तर प्रदेशात नोएडातील जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कामगारांसाठी मोठा निर्णय घेत त्यांच्यासाठी खुशखबर दिली आहे. 

भाड्याच्या घरात राहणाऱ्या मजुर आणि कामगारांकडून पुढच्या महिन्यात भाडं मागू नये असे आदेश नोएडाचे जिल्हाधिकारी बी एन सिंग यांनी जारी केले आहेत. मजुर आणि कामगारांकडे घरभाड्याची मागणी मालकांनी करू नये. जर अशी मागणी केल्याचे आढळून आले तर घरमालकांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, असे  बी एन सिंग यांनी नमूद केले आहे. मात्र. देशावर आलेलं संकट पाहता घरमालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे स्वागत केलं आहे. भाडेकरूंनी घर सोडून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

याबाबत तक्रार आली तर घरमालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दोषींना १ वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आदेश पाळला नाही. तसेच जीवित किंवा वित्तहानी झाली तर दोषींना २ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश