शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : तामिळनाडूमध्ये मोफत धान्य आणि एक हजार रुपये साह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 01:39 IST

coronavirus : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेने बांधकाम व्यवसाय बंद पडला असून, रिक्षाचालकांचा धंदाही पार बंद झाला आहे.

चेन्नई : कोरोनामुळे सारे व्यवहार ठप्प झालेले असताना आणि रोजंदारीवरील मजुरांची जेवणाचीही आबाळ होत असताना तामिळनाडू सरकारने राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना मोफत धान्य आणि एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सरकारने ३२८० कोटी रुपयांचे विशेष पॅकेजच जाहीर केले आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी मंगळवारी ही घोषणा करताना सांगितले की, सर्व रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्यात तांदूळ, साखर, डाळ, तेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू शिधावाटप दुकानांत मोफत दिल्या जातील. याशिवाय प्रत्येक कार्डधारकाला एक हजार रुपयेही देण्यात येणार आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेने बांधकाम व्यवसाय बंद पडला असून, रिक्षाचालकांचा धंदाही पार बंद झाला आहे. त्यामुळे सर्व बांधकाम मजूर आणि रिक्षाचालक यांना एक हजार रुपये मदत, १५ किलो तांदूळ तसेच एक किलो डाळ व तेल देण्यात येईल. याशिवाय मनरेगामध्ये काम करणाऱ्या सर्व मजुरांना या महिन्यात दोन दिवसांचा जादा पगार दिला जाईल. राज्यातील अम्मा कँटीनची व्याप्तीही सरकारने वाढविली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूcorona virusकोरोना वायरस बातम्या