Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 12:55 PM2020-04-05T12:55:08+5:302020-04-05T13:12:22+5:30

Coronavirus : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Coronavirus do not use alcohol based sanitizer while lighting diya or candle SSS | Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण 

Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण 

Next

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी नागरिकांना रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपल्या घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले आहे.

सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र हँड सॅनिटायझर लावून दिवे अथवा मेणबत्ती पेटवणे महागात पडू शकतं. त्यामुळे आता दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करू नका असे सांगण्यात आले आहे. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. दिवे लावताना त्याचे काही प्रमाण जर हातावर असेल तर ते पेटही घेऊ शकते. यामुळे हात भाजण्याची शक्यता ही अधिक असते. यासंदर्भात केंद्र सरकारने जनतेला सूचना दिल्या आहेत.

पीआयबीचे मुख्य महासंचालक के. एस. धतवालिया यांनी रविवारी रात्री दिवे लावताना अल्कोहोलचा समावेश असणारे हँड सॅनिटायझर वापरू नका असं म्हटलं आहे. तसेच दिवे किंवा मेणबत्ती लावताना हँड सॅनिटायझरचा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी देखील केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवसातून कित्येकदा याचा वापर करीत आहे. 

अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझमुळे हातावरील कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. मात्र यामध्ये ‘आयसो प्रोपाईल अल्कोहल’, ‘इथेनॉल’ किंवा ‘एन-प्रोपेनॉल’चे 60 ते 90 टक्के मिश्रण असते. हे उच्च ज्वलनशील पदार्थ आहेत. यामुळे रविवारी दिवे किंवा मेणबत्ती पेटविताना हाताला सॅनिटायझर लावू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. मेणबत्ती किंवा दिवे लावण्याचा प्रयत्न केल्यास सॅनिटायझर लावलेले हात पेट घेऊ शकतात. मोठा धोका होऊ शकतो. यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा दिवे लावताना या सॅनिटायझरचा वापर करू नये, केला असल्यास हात धुवावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा

Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद

Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका

Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास

 

Web Title: Coronavirus do not use alcohol based sanitizer while lighting diya or candle SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.