Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:56 AM2020-04-05T10:56:50+5:302020-04-05T10:59:26+5:30

Coronavirus : पबजी हा जगातील टॉप मोबाईल व्हिडिओ गेमपैकी एक आहे. जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे.

Coronavirus PUBG Mobile Services May Be Suspended for Corona SSS | Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद

Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. पबजी हा जगातील टॉप मोबाईल व्हिडिओ गेमपैकी एक आहे. भारतासह संपूर्ण जगभरात पबजीचे लाखो युजर्स आहेत. मात्र आता पबजी युजर्सना 24 तास पबजी खेळता येणार नाही. जगभरात पबजी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने स्वतः युजर्संना नोटिफिकेशन पाठवून दिली आहे. 

4 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 5 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास पबजी बंद राहणार आहे. त्यामुळे युजर्सना यावेळेत गेम खेळता येणार नाही. ‘Temporary Suspension of Service’ असं म्हणत कंपनीने युजर्सना याबाबत एक नोटिफिकेशन पाठवले आहे. कोरोनाचा संसर्ग हा वेगाने होत आहे. त्यामुळेच कोरोनामुळे पबजी 24 तास बंद असणार आहे. कोरोना व्हायरसशी लढताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या लोकांना आदरांजली वाहता यावी यासाठी पबजीने हा निर्णय घेतला आहे. 

कोरोना विरोधात लढताना जे लोक शहीद झाले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. चीन, हाँगकाँग, मकाऊ  आणि तैवानममध्ये पबजी 24 तास बंद असणार आहे. मात्र भारतात बंद असणार की नाही याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत जगात 11 लाख 67 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 62 हजार 691 जण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका

Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार

 

Web Title: Coronavirus PUBG Mobile Services May Be Suspended for Corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.