शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ...म्हणून वुहानमध्ये थांबला कोरोनाचा प्रादुर्भाव; चीनहून परतलेल्या जीवशास्त्रज्ञाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 09:18 IST

चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचा दावा चिनी सरकारनं केला आहे.

कोरोना विषाणूशी लढण्याचं भारतापुढे मोठं आव्हान आहे. केंद्रासह राज्यातील सरकारांनी या समस्येचा सामना करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न चालवले आहेत. विशेष म्हणजे भारतात कोरोना विषाणूबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचा दावा चिनी सरकारनं केला आहे. जनतेनं सरकारच्या नियमावलीचे पालन केले तरच या दुर्धर रोगावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजनाही केल्या पाहिजेत. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या कोरोनावर नियंत्रण न ठेवल्यास, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात आपल्याला अधिक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चीनच्या वुहान येथून आलेल्या कांग्राचे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ सोमराज यांनी चीननं कशा प्रकारे या रोगावर नियंत्रण मिळवलं आहे, याचा खुलासा केला आहे. सोमराज म्हणाले, प्रत्येकाने शासन व प्रशासनाचे नियम आणि सल्ले पाळले पाहिजेत, तरच कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. वुहानमध्ये 20 जानेवारीला कोरोना विषाणू पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला. तीन दिवसांनंतर चिनी सरकारने 23 जानेवारी रोजी सर्व शहरांना कुलूप ठोकले. त्यानंतर 14 मार्चला वुहानवगळता सर्व शहरे पूर्णपणे उघडली गेली आहेत.आता 1 एप्रिल रोजी वुहान शहर उघडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कांग्राच्या जवाळी उपविभागाच्या मठालाड पंचायतीच्या सोमराज यांनी सांगितले की, ते गेल्या साडेतीन वर्षांपासून चीनच्या वुहानमधील सरकारी अनुदानित फार्मास्युटिकल कंपनीत सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी सात वर्षे भारतात काम केले आहे.ते म्हणाले की, ते 27 फेब्रुवारी रोजी वुहान येथून भारतात आले. त्यावेळी 112 लोक त्यांच्याबरोबर आले. त्यापैकी कोणीही कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह नव्हता. दिल्लीतील आयटीबीपी कॅम्पमध्ये 14 दिवसांच्या विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते आता आपल्या कुटुंबासमवेत घरी राहतात. वुहान शहर उघडल्यानंतर मी पुन्हा कामासाठी तिथे जाणार आहे. तसेच सोमराज हे न्यूमोनिया, टायफॉइडसाठी औषधे तयार करण्याच्या कंपनीत नवीन लस संशोधन व इतर कार्य करतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन