शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus : मोदींच्या आवाहनाला अदानींची साथ; 100 कोटी रुपयांचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 4:03 PM

अदानी फाऊंडेशननं PM-CARES फंडसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी मोदींनी PM-CARES फंडची निर्मिती केली आहे. मोदींनी PM-CARES फंडच्या माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर अनेकांनी PM-CARES फंडला सढळ हस्ते मदत दिलेली आहे. अनेक उद्योगपतीसुद्धा मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.अदानी फाऊंडेशननं PM-CARES फंडसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. या मदतीव्यतिरिक्त आम्ही सरकार आणि जनतेची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू, असंही अदानी फाऊंडेशननं सांगितलं आहे. अदानी ग्रुपशिवाय जेएसडब्ल्यू समूहानंही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली समूहानं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे देणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कंपनीचे कर्मचारी एका दिवसाचं वेतनही दान करणार आहेत. सध्याचे कोरोनाचे संकट पाहता आपत्कालीन परिस्थितीत जेएसडब्ल्यू ग्रुप 'पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी' (पीएम-केअर फंड)मध्ये १०० कोटी रुपये देणार आहे, असंही जेएसडब्ल्यू समूहानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  सेलो ग्रुपने PM-CARES फंडसाठी साडेतीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी समूहाचे अध्यक्ष प्रदीप व पंकज राठोड यांचे आभार व्यक्त केले आहेत. याशिवाय अक्षय कुमारने 25 कोटी देण्याची घोषणा केली आहे, टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनीही 11 कोटी देण्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी, PM-CARES फंडच्या अकाउंट संदर्भातील महत्वाची माहितीही पोस्ट केली होती. PM-CARES फंडाच्या माध्यमातून मायक्रो डोनेशनही स्वीकारले जाईल. आपले हे डोनेशन आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करेल आणि नागरिकांच्या संरक्षणावरील संशोधनास प्रोत्सहित करेल. आपल्या भवी पिढ्यांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भारत बनवण्यासाठी कसलीही कसर सोडू नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या