शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
6
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
7
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
8
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
9
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
10
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
11
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
12
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
13
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
14
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
15
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
16
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
17
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
18
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
19
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
20
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

Corona vaccination : भारताच्या कोरोानाविरोधातील लढाईला मोठं यश, अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 4:05 PM

Corona vaccination in India: कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

ठळक मुद्दे१७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला ११९ दिवस तर अमेरिकेला १५५ दिवस लागलेभारतामध्ये १६ जानेवारी रोजी लसीकरणाची सुरुवात झाली होतीआज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण १७ कोटी, १ लाख, ७६ हजार ६०३ जाणांचे लसीकरण झाले

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. (Corona vaccination in India) मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवाठा कमी होत असल्याने देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी देशात आतापर्यंत १७ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (CoronaVirus Positive News) ११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश बनल आहे. (India becomes first country in world to vaccinate 170 million people in less days)

१७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला ११९ दिवस तर अमेरिकेला १५५ दिवस लागले. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी लसीकरणाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्यसेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ६० वर्षांवरील नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता १८ ते ४४ वर्षांवरील नागरिक यांच्या लसीकरणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकूण १७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 

आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण १७ कोटी, १ लाख, ७६ हजार ६०३ जाणांचे लसीकरण झाले आहे. देशातील एकूण लसीकरणापैकी ६६.७९ टक्के लसीकरण हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाले आहे.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या