CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:14 PM2021-04-30T13:14:48+5:302021-04-30T13:15:34+5:30

CoronaVirus News: देशातील लसीकरण मोहिमेला ब्रेक; अनेक राज्यांत लसींचा तुटवडा

corona vaccination 18 plus people many states including bjp ruled states facing vaccine shortage | CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर

CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसीकरण मोहिमेतही अनेक अडथळे येत आहेत. केंद्र सरकारनं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुरेशा तयारीअभावी केलेली ही घोषणा आता कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे. 

राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

आधी केंद्र सरकार लस उत्पादकांकडून १०० टक्के साठा खरेदी करायचं. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये लसींचं वाटप केलं जायचं. आता मात्र केंद्र सरकार लस उत्पादकांकडून ५० टक्के साठा खरेदी करत आहे. उर्वरित ५० टक्के साठा उत्पादक राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना विकू शकतात. मात्र अनेक राज्यांना लस उत्पादकांकडून पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचादेखील समावेश आहे. 

...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, छत्तीसगडमध्ये १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार नाही. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, गुजरातमध्येही १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू होणार नाही. कोरोना लसींचा साठा मागवला आहे. मात्र अद्याप तो आलाच नसल्यानं लसीकरण शक्य नसल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. गुजरात, बिहारमध्येही उद्यापासून लसीकरण सुरू होणार नाही. गुजरातमध्ये १५ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे.

Web Title: corona vaccination 18 plus people many states including bjp ruled states facing vaccine shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.