Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:24 AM2021-04-30T11:24:40+5:302021-04-30T11:25:11+5:30

Corona Vaccination: राज्यातील लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठाच नसल्यानं मोठी अडचण; लसीकरण मोहिमेला ब्रेक

Corona Vaccination thackeray government decides not to provide corona vaccines to private hospitals | Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

Next

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करतानाही अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच वापरला जाईल. या लसींचा साठा खासगी रुग्णालयांना करण्यात येणार नाही.

...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं ठाकरे सरकारनं आता खासगी रुग्णालयांना लसींचा साठा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून लसींचा साठा खरेदी करावा लागेल. तशी माहिती राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. यासोबतच खासगी रुग्णालयांकडे असलेला कोरोना लसींचा अतिरिक्त साठादेखील राज्य सरकार परत घेण्याची शक्यता आहे.

कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात

१ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मात्र महाराष्ट्राह अनेक राज्यांकडे लसींचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे १ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार नाही. राज्य सरकारकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा असावा यासाठी आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारा कोरोना लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालयं आणि लसीकरण केंद्रांमध्येच वापरण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.

याआधी काय पद्धत होती..?
आधी केंद्र सरकार लस उत्पादकांकडून १०० टक्के साठा खरेदी करायचं. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये लसींचं वाटप केलं जायचं. आता मात्र केंद्र सरकार लस उत्पादकांकडून ५० टक्के साठा खरेदी करत आहे. उर्वरित ५० टक्के साठा उत्पादक राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना विकू शकतात. 

Read in English

Web Title: Corona Vaccination thackeray government decides not to provide corona vaccines to private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.