Corona Vaccination: ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:01 AM2021-04-30T09:01:48+5:302021-04-30T09:02:09+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाबद्दलची नवी माहिती समोर; लसीकरण मोहिमेची रणनीती बदलण्याची शक्यता

Corona Vaccination one dose of vaccine is enough if you are a covid 19 survivor says study | Corona Vaccination: ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

Corona Vaccination: ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे. देशात लसींचा तुटवडा असताना पाश्चिमात्य देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण संशोधन झालं आहे. यामुळे कोरोना लसीकरणाची रणनीतीच बदलू शकते.

राज्यात दैनंदिन रुग्ण वाढीचा आलेख कायम; दिवसभरात ६६,१५९  रुग्ण, तर ७७१ मृत्यू

सध्या कोरोना लसीचे दोन डोस दिले जातात. मात्र कोरोनावर मात केलेल्यांना दोन डोसची गरज नाही. त्यांना केवळ एक डोस पुरेसा असल्याची माहिती पुढे आली आहे. पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं याबद्दल संशोधन केलं. याबद्दलची माहिती सायन्स इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाली. कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज दोन प्रकारच्या असतात. टी किलर सेल्स अँटिबॉडी विषाणूला संपवतात. तर दुसऱ्या अँटिबॉडीज मेमरी बी सेल्स असतात. विषाणूनं भविष्यात पुन्हा हल्ला केल्यास त्याला ओळखून प्रतिकारशक्तीला सतर्क करून विषाणूचा खात्मा करण्यासाठी किलर सेल्स तयार करण्याचं काम या अँटिबॉडीज करतात.

कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात

संशोधन काय सांगतं?
पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनावर मात केलेल्या अमेरिकेतील अनेक व्यक्तींना लसीचा पहिला डोस दिला गेल्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात एँटीबॉडीज तयार झाल्या. मात्र दुसऱ्या डोसला त्यांच्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद मर्यादित स्वरुपाचा होता. तर कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्यानंतर काही दिवसांनंतर परिणाम दिसून आले. अशा प्रकारचं संशोधन याआधी इटली, इस्रायलसह अनेक देशांमध्ये करण्यात आलं आहे.

या संशोधनानं काय साधलं?
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, नव्या संशोधनामुळे फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनीसारख्या युरोपीय देशांमधील लसीकरण मोहिमेची रणनीती बदलण्यात आली. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना दोन डोसऐवजी एकच डोस देण्यात आला. इस्रायलनं काही दिवसांपूर्वीच सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होऊन देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. इस्रायलमध्येही कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना केवळ एकच डोस देण्यात आला. 

Read in English

Web Title: Corona Vaccination one dose of vaccine is enough if you are a covid 19 survivor says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.