अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:54 AM2024-05-02T07:54:36+5:302024-05-02T07:55:23+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अमित शाहा (Amit Shah) यांचा मॉर्फ्ड व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी काँग्रेससमोरील (Congress) अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी सोशल मीडिया माध्यम एक्स ने मोठी कारवाई करताना झारखंड काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे.

Lok Sabha Election 2024: Big action from X in case of Amit Shah's morphed video, Jharkhand Congress account closed | अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अमित शाहा यांचा मॉर्फ्ड व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी काँग्रेससमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी सोशल मीडिया माध्यम एक्स ने मोठी कारवाई करताना झारखंड काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे. याच हँडलवरून अमित शाह यांचा एक डीपफेक मॉर्फ्ड व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनीही कारवाईस सुरुवात केली आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनंतर झारखंड काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष गजेंद्र सिंह यांनाही दिल्ली पोलिसांनी समन्स आणि नोटिस पाठवली आहे. दरम्यान, या नोटिशीला तत्काळ उत्तर देणं कठीण असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच त्यांना ३ मे रोजी आयटी सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पक्ष आपल्या कायदेशीर सल्लागारांकडून सल्ला घेत आहे. दरम्यान, झारखंड काँग्रेसवरील वाढत्या दबावामुळे दिल्ली पोलिसांनी एक्सला आमचं अकाऊंट बंद करण्यास सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणी सांगितले की, झारखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेख ठाकूर यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. २८ एप्रिल रोजी स्पेशल सेलकडून दाखल झालेल्या तक्रारीच्या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ कार्यालयात तपासासाठी हजर राहण्यात सांगितले आहे. तर ठाकूर यांनी याबाबत सांगितले की, मला दिल्ली पोलिसांकडून नोटिस मिळाली आहे. मात्र मला नोटिस का बजावण्यात आली हे माझ्या  आकलानापलिकडे आहे. हे अराजकाशिवाय आणखी काही नाही आहे. जर काही तक्रार असेल, तर त्यांनी आधी माझ्या एक्स अकाऊंटवरील माहिती सत्यापित केली पाहिजे. 

काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा आरक्षणासंबंधीचा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यावरून अमित शाह यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं. काँग्रेस खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 

Web Title: Lok Sabha Election 2024: Big action from X in case of Amit Shah's morphed video, Jharkhand Congress account closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.