शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, मौलाना अब्दुल्ला सलीमला बिहारमधून उचललं; आता होणार UP स्टाईल न्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:05 IST

या कारवाईनंतर दोन्ही राज्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे...

गौमाता आणि योगी आदित्यनाथ यांच्या आईसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मौलाना अब्दुल्ला सलीमला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशपोलिसांनी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून मौलानाला ताब्यात घेतले. ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करून त्याला उत्तर प्रदेशात नेले जात आहे. या कारवाईनंतर दोन्ही राज्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

मौलानाचा एत व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान (जलसा) मौलाना सलीमने मुख्यमंत्री आणि त्यांच्या आई संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर संतापाची लाट उसळली. अनेक संघटनांनी हे भडकाऊ आणि असंवेदनशील असल्याचे म्हणत संबंधित मौलानाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. लखनौमधील हजरतगंज भागात काही तरुणांनी निदर्शनही केले. परिवर्तन चौक आणि गांधी पार्क परिसरात मौलानाविरुद्ध निषेधाचे पोस्टरदेखील लावण्यात आले होते. हे पोस्टर नंतर, खबरदारी म्हणून पोलिसांकडून हटवण्यातही आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना सलीमने आपल्या भाषणात उत्तर प्रदेशातील गोहत्या बंदी कायद्यावर टीका करताना अत्यंत प्रक्षोभक भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये मौलानाविरुद्ध १२० हून अधिक गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले होते. अटकेची शक्यता वाटू लागल्यानंतर, मोलानाने आपल्या समर्थकांना सोशल मीडिया आणि रस्त्यावर उतरून विरोध करण्याचे आवाहनही केले होते, यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली होती.

सध्या उत्तर प्रदेश पोलीस मौलानाला लखनौमध्ये घेऊन जात आहेत. तेथे त्याची पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली जाईल. या संपूर्ण घटनाक्रमानंतर, दोन्ही राज्यांतील पोलीस हाय अलर्टवर असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maulana Arrested for Controversial Remarks Against CM Yogi on Cow Slaughter Law.

Web Summary : Maulana Abdullah Salim was arrested in Bihar for offensive comments about CM Yogi and his mother regarding cow slaughter laws. He faces multiple FIRs in Uttar Pradesh. The arrest followed widespread outrage and protests. Police are investigating, heightening security in both states.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBiharबिहारPoliceपोलिस