शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

एआयबीच्या तन्मयची सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर वादग्रस्त टीका

By admin | Updated: May 29, 2016 21:59 IST

तन्मय भट्टनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांचा अपमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29- एआयबी आणि वाद हे जणू समीकरणच झालंय. आता एआयबीच्या एका व्हिडीओनं नव्या वादाला फोडणी दिली आहे. एआयबी कॉमेडी मास्टर तन्मय भट्टनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा अपमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तन्मयनं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर टीका केलीय. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये सचिन आणि लता मंगेशकर यांच्या शाब्दिक चकमक झडल्याचं दाखवण्यात आलं असून, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरून तन्मय भट्ट याच्यावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली आहे. अनेक बॉलिवूडकरांनी हा व्हिडीओ फन्नी नसून, वादग्रस्त असल्याचं म्हटलं आहे.
या आधीही एआयबीनं अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोअर यांच्याबाबत शिवीगाळ केल्याचं दाखवलं होतं. त्याप्रकरणी एआयबीविरोधात एफआयआर दाखल झालं होतं. या व्हिडीओमध्ये तन्मयनं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांना 'जॉन स्नोही मेला मग तुम्ही कधी मरणार आहात. तुमचा चेहरा आठ दिवस पाण्यात ठेवल्यासारखा दिसतो आहे', असे प्रश्न विचारून अत्यंत हीन भाषेत टीका केली आहे. व्हिडीओवर अनुपम खेर, रितेश देशमुख, सेलिना जेटली आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही सडकून टीका केली आहे. 
 

हा व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला, कोणाचाही अनादर करणं हा गमतीचा भाग होऊ शकत नाही- रितेश देशमुख