शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यास ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता मनपा कार्यालयात घडली.

जिल्हा परिषद : दूध उत्पादनात ११ हजार लिटरची वाढ
नागपूर : ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, सोबतच शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविली जात आहे. योजनेमुळे २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील दूध उत्पादनात दर महिन्याला ११ हजार लिटरने वाढ झाली आहे.
गेल्या वर्षात या योजनेसाठी ९३ गावांना दत्तक घेतले होते. यासाठी विभागाने १.४१ कोटींची तरतूद के ली होती. यातून गोधन वाढविण्यासोबतच दूध उत्पादनावर भर देण्यात आला. या गावांतील ९२०६ दुभत्या जनावरांवर उपचार करण्यात आले तर पशुपालकांच्या घरोघरी जाऊ न ४११६४ जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. सोबतच वैरण उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्याने जिल्ह्यातील वैरण उत्पादन ३०२४४ मेट्रिक टन इतके वाढले आहे.
या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न क रण्यात आला. दत्तक गावात पशुपालक मंडळ गठित करून गावातील दुभत्या जनावरांची संख्या वाढविण्यासोबतच वैरण व औषधोपचार यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)
चौकट...
ठळक वैशिष्ट्ये...
- बारमाही चारा उपलब्ध करणे
-चाऱ्याच्या उत्पादनात वाढ करणे
-निकृष्ट चारा सक स करणे
-पथकामार्फत जनजागृती
-पशुपालक मंडळ स्थापन करणे
-जनावरांची प्रत्यक्ष पाहणी
-दुभत्या जनावरांना औषधोपचार
चौकट........................
वर्षभरात दूध उत्पादनात वाढ
कामधेनू योजनेमुळे ग्रामीण भागातील दुभत्या जनावरांना सकस आहार व औषधोपचार मिळाल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता वाढली. वर्षभरापूर्वी जिल्ह्यात दररोज ३५२७० लिटर होणारे दूध उत्पादन आता ४६३८८ लिटरपर्यंत पोहचले आहे.
चौकट...
४० गावांत योजना राबविणार
या योजनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ४० गावांत ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बाबा वाणी यांनी दिली.