शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 07:02 IST

तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : केंद्रात सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या एनडीएतील घटक पक्षांना दिली जाणारे मंत्रिपदे व त्यांच्या पसंतीचे मंत्रालयाबाबत गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि विनोद तावडे यांनाहीबोलावण्यात आले होते. 

तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचीही त्यांची मागणी आहे. चंद्राबाबूंना लोकसभा अध्यक्षपदासह किमान तीन मंत्रिपदे हवी आहेत. जदयुचे नेते नितीश कुमार यांनी रेल्वे, कृषी आणि अर्थराज्यमंत्री अशी तीन मंत्रिपदे मागितली आहेत. शिंदेसेनेनेही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.

मोदींची होणार संसदीय पक्षनेतेपदी निवडभाजप संसदीय पक्ष आणि रालोआ (एनडीए) संसदीय पक्षाच्या शुक्रवारी (दि. ७) होणाऱ्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर मोदी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. भाजपने आपले सर्व खासदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्या दिल्लीला बोलावले आहे.संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता रालोआ संसदीय पक्षाची बैठक होईल. या बैठकीत भाजपशिवाय तेलुगू देसम पार्टी, जदयु, लोक जनशक्ती पार्टी, शिवसेना, रालोद, अपना दलसह रालोआचे सर्व खासदार भाग घेतील. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या जवळपास १० अपक्ष खासदारांनाही या बैठकीला निमंत्रित करण्यात आल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. रालोआ संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी रालोआ आणि भाजप नेत्यांसह राष्ट्रपती भवनात जातील आणि राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

९ जूनला शपथविधी सोहळा? नरेंद्र मोदी ९ जूनला सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ८ जूनला शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ज्योतिषांनी ९ जूनचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितल्याने आता ९ जूनला हा सोहळा होण्याची शक्यता आहे.

शिंदेसेनेला कोणती खाती?शिंदेसेनेला अवजड उद्योग, जहाजबांधणी, बंदरे व आरोग्य यासारखी मंत्रालये  मिळू शकतात. लोक जनशक्ती पार्टीला अन्न प्रक्रिया, अन्नधान्य पुरवठा हे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्याची भूमिका भाजपची असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू