शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

पाकिस्तानचं कौतुक करणाऱ्या सौदी राजपुत्राची गळाभेट कशासाठी?; काँग्रेसचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 7:06 PM

काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

नवी दिल्ली: सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमानचं प्रोटोकॉल तोडून स्वागत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसनं निशाणा साधला. पाकिस्तानच्या तथाकथित दहशतवादविरोधी प्रयत्नांचं कौतुक करणाऱ्या व्यक्तीची गळाभेट घेऊन मोदी शहिदांचं स्मरण करतात का, असा सवाल काँग्रेसनं विचारला. भारतात येण्यापूर्वी सलमान यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळी सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननं दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात संयुक्त निवेदन दिलं. त्या निवेदनापासून सौदी अरेबियानं फारकत घ्या, असं मोदींनी सलमान यांना सांगावं, अशी मागणीदेखील काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बिन सलमान आणि मोदींच्या गळाभेटीचा फोटो आणि पाकिस्तान-सौदीचं संयुक्त निवेदन याबद्दल एक ट्विट केलं. 'राष्ट्रहित विरुद्ध मोदींची गळाभेटीची कूटनीती' अशा शब्दांमध्ये सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला. पाकिस्तानला 20 अब्ज डॉलर देण्याचं आश्सासन देणाऱ्या, त्यांच्या दहशतवादविरोधातील प्रयत्नांचं कौतुक करणाऱ्या व्यक्तीचं मोदींनी प्रोटोकॉल तोडून स्वागत केलं, अशी टीका त्यांनी केली. पुलवामातील शहिदांचं स्मरण करण्याची हीच पद्धत आहे का?, असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला. 'मोदीजी, पाकिस्तानसोबतच्या संयुक्त निवेदनापासून तुम्ही सौदी अरेबियाला फारकत घ्यायला सांगाल का? त्या निवेदनात मसूद अजहरसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची मागणी जवळपास फेटाळून लावण्यात आली आहे,' असं सुरजेवाला म्हणाले. काल रात्री सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान दिल्लीत दाखल झाले. मोदींनी विमानतळावर त्यांचं प्रोटोकॉल तोडून स्वागत केलं. सौदी राजपुत्राची पहिल्यांदाच द्विपक्षीय चर्चेसाठी भारताचं आले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबियाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान