शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 11:52 AM

Coronavirus : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंद, केंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप

ठळक मुद्देराज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंदकेंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही बाब नाकारली होती. परंतु आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे महाराष्ट्राच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एका आरशासमोर उभं करून प्रश्न विचारला पाहिजे की काय केंद्रानं महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? लसीकरणाच्या मोहिमेत होत असलेल्या गडबडीचं जबाबदार केंद्र सरकार आहे. ज्यामध्ये लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा न होणंदेखील सामील आहे," असं चिदंबरम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निशाणा साधला. चिदंबरम यांच्याकडून महाराष्ट्राचं समर्थन"केंद्र करोना विषाणूचा प्रादुर्भावावर महाराष्ट्रातील तथ्यांकडे दुर्लक्ष करून लक्ष्य करत आहे. महाराष्ट्रानं ८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. जवळपास २० राज्ये महाराष्ट्रापेक्षा मागे आहेत," असं चिदंबरम म्हणाले. महाराष्ट्रात फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांचं ७३ टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. केवळ पाच राज्यांनी यात चांगली कामगिरी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यातही महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. हे तथ्य असून ते केंद्रीय आरोग्यमत्र्यांच्या वक्तव्यातीलच असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या