congress rahul gandhi tweets covid vaccine indigenous vaccine modi government | "कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

"कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 24,61,191 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 48,040 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. 

भारतातही कोरोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. कोरोना व्हायरसची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनीती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. "भारत कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होईल. देशाला एक स्पष्ट आणि सर्वांना सामावून घेणारी रणनीती आखायला हवी. जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस सहजरित्या घेता येईल. केंद्र सरकारने हे आताच करायला हवं'' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

कोरोना, लॉकडाऊन, भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत.  मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट राहुल यांनी केलं होतं.

राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. EIA2020 उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं आणखी एक भयंकर उदाहरण असं देखील त्यांनी याआधी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी यासोबतच LootOfTheNation हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"

Video - पावसाचे थैमान! ....अन् साचलेल्या पाण्यात अडकली रुग्णवाहिका

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress rahul gandhi tweets covid vaccine indigenous vaccine modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.