wanted to be alone mixed poison in ice cream and fed the family minor sister died | भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना केरळच्या कासरगोडमध्ये घडली आहे. एकटं राहण्यासाठी एक तरुण आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठला. आईस्क्रिममध्ये विष टाकून त्याने कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणाच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य विषारी आईस्क्रिम खाल्ल्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कासरगोडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एकटं राहता यावं यासाठी एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या कुटुंबीयांच्या आईस्क्रिममध्ये विष घातले आणि ते त्यांना खाण्यासाठी दिले. यामध्ये लहान बहिणीचा मृत्यू झाला आहे. तर तरुणाच्या वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. अल्बिन असं या तरुणाचं नाव असून त्याने आईस्क्रिमध्ये विष मिसळल्याचं कबूल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे. तसेच एकटं राहण्यासाठी आईस्क्रिममध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अल्बिनने पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"

Video - पावसाचे थैमान! ....अन् साचलेल्या पाण्यात अडकली रुग्णवाहिका

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: wanted to be alone mixed poison in ice cream and fed the family minor sister died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.