"मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 03:56 PM2020-10-02T15:56:23+5:302020-10-02T16:04:21+5:30

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

congress rahul gandh and priyanka gandhi vadra and around 200 party workers fir lodged | "मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल

"मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी "मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा" असं म्हटलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राहुल यांनी हे ट्विट केलं आहे. "मी जगातील कोणालाही घाबरणार नाही. मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन. गांधी जयंतीच्या शुभेच्छा" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की

राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच "पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?, आमची गाडी थांबवण्यात आली म्हणूनच चालत निघालो होतो" असं देखील म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. 

Video - "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार", संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

हुल यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. यावरून विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Read in English

Web Title: congress rahul gandh and priyanka gandhi vadra and around 200 party workers fir lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.