Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:25 IST2025-11-28T12:24:18+5:302025-11-28T12:25:24+5:30
Rahul Mamkuttathil News: महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपांखाली काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषण आणि तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने गुरुवारी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त कळताच राहुल ममकूटथिल फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे. हे प्रकरण केरळच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे.
#WATCH | Palakkad, Kerala: BJP workers staged a protest against Rahul Mamkootathil in Palakkad
— ANI (@ANI) November 27, 2025
This comes after a woman submitted a sexual harassment complaint against suspended Congress MLA Rahul Mamkootathil to Chief Minister Pinarayi Vijayan. pic.twitter.com/JcxeVzM7Xh
राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल ममकूटथिल यांचा मित्र जॉबी जोसेफ याच्यावरही पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप आहे आणि त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम शहर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. पीडितेचा जबाब तिरुवनंतपुरमच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाईल. तसेच डॉक्टरांचे एक पथक तिची वैद्यकीय तपासणी करेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala | On sexual harassment allegation against suspended Congress MLA Rahul Mamkootathil, Congress leader Deepa Dasmunshi says, "Rahul Mamkootathil has been suspended from the party, and he is not participating in any Congress programs...If the CM… pic.twitter.com/6zebNoKiz1
— ANI (@ANI) November 27, 2025
गुन्हा दाखल झाल्यापासून राहुल ममकूटथिल फरार असल्याचे वृत्त आहे. काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममकूटथिल गुरुवारी संध्याकाळपर्यंत कानडी परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. परंतु, नंतर ते गायब झाले. ममकूटथिल हे केरळ युवा काँग्रेसचे राज्य अध्यक्ष होते. परंतु, बलात्काराच्या आरोपांमुळे आणि विरोधकांच्या तीव्र निषेधानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक महिला आणि एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाचे आरोप दाखल केल्याची माहिती आहे.