"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:07 IST2025-09-24T14:07:41+5:302025-09-24T14:07:55+5:30

केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. 

congress mallikarjun kharge says Yogi considers himself PM Modi's successor big attack in CWC meeting, used this word for Nitish Kumar bihar | "योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (24 सप्टेंबर 2025) पाटण्यातील सदाकत आश्रम येथे आयोजित सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही थेट निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. 

‘योगी स्वत:ला पंतप्रधानांचा वारसदार समजतात’ -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवताना योगी काँग्रेसाध्यक्ष खरगे म्हणाले, "सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वत:ला पंतप्रधानांचा वारसदार समजतात. त्यांनी यापूर्वी आरक्षणाविरोधात लेख लिहिला होता. आता त्यांनी जातीय रॅलींवर बंदी घातली आहे. यावेळी पंतप्रधानांकडे आपला रोख वळवत खरगे म्हणाले, "एकीकडे आपण सर्वजण जातीय जनगणनेची मागणी करत आहोत, तर दुसरीकडे जे लोक अन्याय आणि अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरतात, त्यांना तुमचे मुख्यमंत्री तुरुंगात टाकण्याची भाषा बोलतात. हे योग्य आहे का? हे पंतप्रधानांनी देशाला सांगावे.

नीतीश सरकारवर हल्लाबोल -
काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, भाजपने जानेवारी 2024 मध्ये नीतीश कुमार यांना पुन्हा पाठिंबा देऊन बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन केले. नीतीश सरकारने विकासाचे आश्वासन दिले. पण, बिहारची अर्थव्यवस्था मागे पडत आहे. डबल इंजन सरकारचा दावा पोकळ ठरला आहे. केंद्राकडून बिहारला कोणतेही विशेष पॅकेज मिळालेले नाही.

‘नीतीश आता भाजपसाठी 'ओझं'’
खरगे पुढे म्हणाले, सीडब्ल्यूसीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. आपण अशा वेळी एकत्र आलो आहोत, जेव्हा देश आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर आव्हानात्मक आणि चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. एनडीए आघाडीतील अंतर्गत मतभेद आता समोर येत आहेत. भाजपने नीतीश कुमार यांना मानसिकदृष्ट्या सेवानिवृत्त केले आहे. आता भाजप ते 'ओझं' वाटू लागले आहेत.
 

Web Title: congress mallikarjun kharge says Yogi considers himself PM Modi's successor big attack in CWC meeting, used this word for Nitish Kumar bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.