शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

"सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:05 IST

उत्तर प्रदेशात जितिन प्रसाद यांच्या रुपात काँग्रेसला धक्का; आता सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला जोरदार धक्का दिला. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्यानं उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. २५ वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या आणि नंतर भाजपवासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी तसा दावा केला आहे.राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदतसचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा रिटा बहुगुणा जोशी यांनी 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला. 'पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,' असं रिटा म्हणाल्या. काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा असल्याचं त्या पुढे म्हणाल्या. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामाराहुल गांधींचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची निर्मिती करत आहेत. या कार्यात योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं प्रसाद यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेसBJPभाजपा