शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: "तुघलकी लॉकडाउन लावा अन् घंटी..."; कोरोना व्हायरस मुद्द्यावरून राहुल गांधी मोदी सरकारवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 14:31 IST

आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 42 लाख 91 हजार 917वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1,74,308 वर पोहोचला आहे. (CoronaVirus Update)

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी कोरोना (CoronaVirus) विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे. (Congress leader Rahul Gandhi targets the central government on corona related strategy)

यातच काँग्रेस सरचचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकांना आवाहन केले आहे, की ‘‘प्रीय देशवासियांनो, हा काळ आपल्या सर्वांसाठीच संकटाचा काळ आहे. आपल्या सर्वांचे प्रिय लोक, कुटुंबीय, जवळपासचे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आपल्या सर्वांना विनंती करते, की मास्क लावा आणि कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करा. ही लढाई आपण सावधपणे जिंकायला हवी.’’

CoronaVirus : आता कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्राला मुकेश अंबानींचा मदतीचा हात, मोफत पुरवतायत ऑक्‍सीजन

2.17 लाख नवे कोरोनाबाधित - गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 1185 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट  म्हणजे, 1,18,302 जण कोरोनावर मात करून ठणठणीत बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी देशात 2,00,739 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. तर गेल्या 30 सप्टेंबरला देशात अकराशे हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 42 लाख 91 हजार 917वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1,74,308 वर पोहोचला आहे.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

11.72 कोटी लशी देण्यात आल्या आहेत -देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 कोरोना डोस देण्यात आले आहेत. काल 27 लाख 30 हजार 359 डोस देण्यात आले. लशीचा दुसरा डोस देण्याच्या अभियानाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे. 

कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक -देशातील कोरोना मृत्यूदर 1.23 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 88 टक्के एवढा आहे. अॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होऊन ते 10 टक्क्यांच्याही वर पोहचले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी