CoronaVirus Reliance Industries Ltd to send 100 tons of medical use oxygen to maharashtra at no cost | CoronaVirus : आता कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्राला मुकेश अंबानींचा मदतीचा हात, मोफत पुरवतायत ऑक्‍सीजन

CoronaVirus : आता कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्राला मुकेश अंबानींचा मदतीचा हात, मोफत पुरवतायत ऑक्‍सीजन

नवी दिल्‍ली - कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. अशात, कोरोनाचा सामना करण्यासाठी अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानीदेखील (Mukesh Ambani) आता सरकारला साथ देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुकेश अंबानी यांनी कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत सरकारला मदद करण्यासाठी आपल्या रिफाइनरीतून ऑक्‍सीजन उपलब्‍ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. सध्या देशभरात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. महाराष्ट्राबरोबरच देशभरात अनेक ठिकाणी ऑक्‍सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यातही अडचणी येत आहेत. (CoronaVirus Reliance Industries Ltd to send 100 tons of medical use oxygen to maharashtra at no cost)

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

बिझनेस स्टॅन्डर्डने दिलेल्या वृत्तानुसार, अंबानी यांची रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेड जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्‍प्‍लेक्‍स चालवते. तिने जामनगरहून महाराष्‍ट्रासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने अंतर्गत पॉलिसीचा हवालादेत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. महाराष्‍ट्र सरकारमधील शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत, महाराष्‍ट्र सरकारला रिलायन्सकडून 100 टन ऑक्‍सिजन गॅस उपलब्‍ध केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारांची तयारी पूर्ण न झाल्याने रुग्णालयांतील रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर संक्रमित रुग्णांचा मृत्यू होत आहे. महाराष्‍ट्रात देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे मुख्य सेंटर बनली आहे. येथेच मुकेश अंबानींचे घर आणि रिलायन्सचे मुख्‍यालयदेखील आहे. 

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सने वैद्यकीय उपयोगासाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर, आपल्या पेट्रोलियम कोक गॅसीफ‍िकेशन युनिटमधून काही ऑक्‍सिजन महाराष्‍ट्र सरकारला पाठवायला सुरूवात केले आहे.

दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पने आलल्या कोची रिफाइनरीमध्ये 20 टन ऑक्‍सिजन गॅसचा स्टॉक तयार केला आहे. तो वैद्यकीय वापरासाठी बॉटलर्सना उपलब्ध करून दिला जाईल. रिफायनरिज नायट्रोजन प्रोडक्‍शनसाठी एअर-सेपरेशन प्‍लांट्समध्ये मर्यादित इंडस्ट्रियल ऑक्‍सीजनचे उत्‍पादन करू शकतात. वैद्यकीय उपयोगात येणारा ऑक्‍सीजन इतर गॅस, जसे कार्बन डायऑक्‍साइडपासून मुक्‍त करून 99.9 टक्के शुद्ध केला जातो.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

English summary :
CoronaVirus Reliance Industries Ltd to send 100 tons of medical use oxygen to maharashtra at no cost

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Reliance Industries Ltd to send 100 tons of medical use oxygen to maharashtra at no cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.