CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 02:39 PM2021-04-15T14:39:09+5:302021-04-15T14:40:29+5:30

उमेश  यांना या रुग्णालयात Covaxin एवजी Covishield चा डोस देण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच ते भयभीत झाले. यानंतर त्यांनी इतर लोकांना संबंधित घटनेची माहिती दिली. मग...

UP Maharajganj man given covishield after covaxin | CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

Next


महराजगंज : उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या जबाबदार कर्मचाऱ्यांत मोठा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. येथे सीडीओच्या वाहन चालकाला आधी कोरोनाची Covaxin लस देण्यात आलील तर दुसऱ्यांदा Covishield चा डोस देण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात येताच पीडित व्यक्तीसह इतर लोक नाराजी व्यक्त करत लसीकरण केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी येथे जबरदस्त धिंगाणा घातला. यानंतर. घटनेची माहिती मिळताच संबंधित आधिकारी घटना स्थळी पोहोचे. यानंतर प्रकरण शांत झाले. (UP Maharajganj man given covishield after covaxin)

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

25 फेब्रुवारीला देण्यात आला होता पहिला डोस -
पीडित उमेश यांनी सांगितले, की ते सीडीओ गौरव सिंह सोगरवाल यांचे वाहनचालक आहेत. त्यांना 25 फेब्रुवारीला Covaxinचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यांना 25 मार्चला दुसरा डोस मिळणार होता. मात्र, याला काही कारणामुळे उशीर झाला. ते गेल्या मंगळवारी दुसरा डोस घेण्यासाठी डिल्हा रुग्णालयात (महिला) गेले होते.

अधिकाऱ्यांकडे केली तक्रार -  
उमेश  यांना या रुग्णालयात Covaxin एवजी Covishield चा डोस देण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच ते भयभीत झाले. यानंतर त्यांनी इतर लोकांना संबंधित घटनेची माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासंदर्भात बोलताना मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. एके श्रीवास्तव म्हणाले, लशीचा कसल्याही प्रकारचा साइड इफेक्ट नाही. यावर आरोग्य कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरणही घेण्यात आले आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

उत्तर प्रदेशात सातत्याने वाढतोय रुग्णांचा आकडा -
उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. येथे गेल्या 24 तासांत 20,510 नवे रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1,11,835 वर पोहोचली आहे. 4,517 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9,376 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 2,10,121 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

 

Web Title: UP Maharajganj man given covishield after covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.