शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 9:45 PM

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देराहुल गांधींची भाजपवर जोरदार टीकाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करतेय - राहुल गांधीमीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. (congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi)

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

भाजप सरकारने लोकशाहीचे नुकसान केले

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील वर्तमान सरकार लोकशाही प्रणालीचे मोठे नुकसान करत आहे. भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस लोकशाहीसाठी झटत आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

मीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न

वर्तमान सरकारकडून प्रसारमाध्यमांपासून न्यायप्रणालीपर्यंत वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. मणिपूरचे राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांनीही अनेक विधेयक मंजूर होऊ दिली नाही, असा दावाही राहुल गांधींनी केला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, माझे वडील राजीव गांधी यांची हत्या आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. ते अनेक शक्तींशी न घाबरता लढले, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ