शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:22 PM

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला.

नवी दिल्ली - भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विट करत आरोप केला आहे, की पंतप्रधान मोदी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. आम्ही ती परत कधी मिळवत आहोत? (Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue)

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "मोदीजी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारतीची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली. आम्ही ते परत कधी मिळवत आहोत?" राहुल गांधी यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा याच मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील ही चर्चा जवळपास नऊ तास चालली. अशातच राहुल गांधी यांचे हे ताजे ट्विट आले आहे.

भारत-चीन यांच्यात झालेल्या लष्करी चर्चेच्या 12 व्या फेरीच्या सुमारे दोन आठवडे आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, पूर्व लडाखमधील सततच्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम होत आहे. ताझाकिस्तानची राजधानी दुशांबे येथे 14 जुलै रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी -जगातील सर्वात शक्तीशाली 15 सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपविण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी म्हटले आहे. भारताला हे अध्यक्षपद मिळालेल्याने चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनladakhलडाखBJPभाजपाcongressकाँग्रेस